Voting SaamTV
मुंबई/पुणे

Andheri By-Election: बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला (Andheri By-Election) अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक (By-Election) होत आहे. यासाठी आज 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. तर 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.  (Andheri By-Election)

सकाळी 7 पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानासाठीची वेळ असणार आहे.

सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांनी आवर्जून मतदान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी 333 कंट्रोल युनीट, 333 बॅलेट युनीट व 359 व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली  जाणार आहेत. मतदान विषयक यंत्र सामुग्री व संबंधित मनुष्यबळ वाहून नेण्यासाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 2 लाख 71 हजार 502 मतदार आहेत. यात 1 लाख 46 हजार 685पुरुष मतदार, 1 लाख 24 हजार 816 महिला मतदार तर एक तृतीय पंथीय मतदाराचा समावेश आहे. 256 मतदान केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत भाजपकडून ही निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु इतर अपक्ष आणि काही उमेदवारांनी या निवडणुक प्रक्रियेत उमेदवारी कायम ठेवल्याने अंधेरी पोट निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

पोटनिवडणूकीसाठी 07 उमेदवार रिंगणात

१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)

३. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

४. नीना खेडेकर (अपक्ष)

५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

६. मिलिंद कांबळे (अपक्ष)

७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT