Ulhasnagar Crime News
Ulhasnagar Crime News  saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar : उल्हासनगरकरांची नववर्षाची पहाट उजाडली राड्याने; चाैघांवर चाॅपरने हल्ला, दाेघे पाेलिसांच्या ताब्यात

अजय दुधाणे

Gudi Padwa 2023 : आज मराठी नववर्षाचा (marathi new year) पहिला दिवस. गुढीपाडवा (gudi padwa 2023) आणि नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी उत्साह असतानाच उल्हासनगर (ulhasnagar camp 4) येथे मात्र पहाटेच्या सुमारास मारामारी आणि लूटमारीचा प्रकार घडला आहे. या घटनेने उल्हासनगर कॅम्प 4 परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

उल्हासनगर कॅम्प 4 भागात पहाटे साडे तीन वाजता काही युवकांनी चार जणांवर चॉपरने हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. या युवकांनी काहींचे मोबाईल आणि पैसे काढून घेतले असे देखील सांगण्यात येत आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उल्हासनगर कॅम्प 4 भागात तीन जणांवर हल्ला करण्यात आला. तसेच उल्हासनगर कॅम्प भागात एकावर हल्ला झाला आहे. हल्ला करणारे रिक्षातून फिरत होते. या घटनेतील जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये रवी निर्भवणे, विद्यानंद पांडे, रोहित पंडित अन्य एका जखमीचा समावेश आहे.

दरम्यान या घटनेतील संशयित म्हणून विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Akola Income Tax Department Raid: अकाेल्यात आंगडिया कार्यालयावर 'आयकर'ची धाड, नांदेडच्या 'त्या' कारवाईचे धागेदोरे?

T20 World Cup: संजू सॅमसन की रिषभ पंत? यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळायला हवी? गौतम गंभीरने सुचवलं नाव

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; खरेदीसाठी जाण्याआधी तपासा आजचे दर

Latur Water Shortage : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक गडद; ग्रामीण भागात १५ दिवसांनी पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT