Virar-Alibag Corridor Saam Digital
मुंबई/पुणे

Virar-Alibag Corridor : गुंठ्याला ५० लाखच हवे...अन्यथा जमिनीचा तुकडाही देणार नाही; विरार-अलिबाग कॉरीडॉर बाधित शेतकरी धडकले जिल्‍हाधिकारी कार्यालयावर

Virar-Alibag Corridor News : विरार अलिबाग कॉरीडॉर बाधित शेतकऱ्यांनी आज अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गुंठ्याला 50 लाख रुपये दर द्यावा, 20 टक्‍के विकसीत भूखंड मिळावा आणि पुनर्वसनाचे इतर लाभ मिळावेत अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

Sandeep Gawade

सचिन कदम

Virar-Alibag Corridor

विरार अलिबाग कॉरीडॉर बाधित शेतकऱ्यांनी आज अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गुंठ्याला 50 लाख रुपये दर द्यावा, 20 टक्‍के विकसीत भूखंड मिळावा आणि पुनर्वसनाचे इतर लाभ मिळावेत अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्‍य झाली नाही तर जमिनी देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. या मोर्चात उरण व पनवेल तालुक्‍यातील 16 गावांमधील बाधित शेतकरी मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. शासनाने शेतकऱ्यांना सक्‍तीचे भूसंपादन करण्‍याच्‍या नोटीसा बजावल्‍या आहेत. त्‍यावर तुम्‍ही सक्‍तीचे भूसंपादन करूनच दाखवा असा इशाराही कॉरीडॉर रोड संघर्ष समितीने दिला आहे.

प्रि कास्ट पद्धतीमुळे मिळणार पक्की आणि मजबुत घरं

नाणीवली गावच्या हद्दीतील साडेसहा एकर जागेत 44 दरडग्रस्तांचे पुर्नवसन केले जात आहे. या पूर्नवसनाच्या कामात पारंपारीक बांधकाम पद्धतीचा वापर न करता प्रि कास्ट टेक्नॉलॉजिचा वापर केला जात आहे. यामध्ये घराच्या जोत्याचे फुटींग, कॉलम, बिम आणि छप्पर हे मोल्डच्या सहाय्याने बाहेर तयार करून घराच्या जागेवर जोडले जात आहे. यामुळे कमी वेळात मजबुत पक्की घर इरसाल वाडी दरडग्रस्तांना मिळणार आहेत.

19 जुलैच्या मध्यरात्री खालापुर तालुक्यातील इर्शालवाडीवर दरड कोसळली या दरड दुर्घटनेत सुमारे 84 ग्रामस्थ गाडले गेले. या पैकी शोधकार्यात 27 ग्रामस्थांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले तर 57 ग्रामस्थांना बेपत्ता जाहीर करूननंतर मृत घोषित करण्यात आले. या वाडीवरील 42 कुटूंब सद्या शासनाने दिलेल्या तत्पुरत्या निवारा शेडमध्ये म्हणजे कंटेनरमध्ये राहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे...; मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल

Maharashtra Live News Update : . कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

SCROLL FOR NEXT