Teacher Beaten Student Saam Tv
मुंबई/पुणे

Teacher Beaten Student : भयंकर! विद्यार्थ्याचे केस खेचले, लाथाबुक्क्यांनी मारले; शिक्षकांच्या क्रूर शिक्षेचा Video Viral

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील धक्कादायक घटना

रोहिदास गाडगे

Khed Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिक्षकांना पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून काही शिक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

आकरावीच्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना २१ जानेवारी घडल्याची माहिती आहे. ज्ञानमंदिर जुनियर कॉलेज आळे येथे हा प्रकार घडला आहे.

शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीही शहानिशा न करता शाळेतील शिक्षकांनी एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा- बुक्यांनी जबर मारहाण केली.

माझी काहीच चूक नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिला. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये घटनेचे चित्रिकरण केले. ही क्लिप सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो.

ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यालय प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तत्काळ बैठक बोलावली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थीसह पालकांकडून विद्यालयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT