BHIMASHANKAR TEMPLE ENDS VIP DARSHAN | ONLINE BOOKING NOW MANDATORY FOR ALL DEVOTEES saam tv
मुंबई/पुणे

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर प्रशासनाकडून दर्शन नियमात मोठा बदल, VIP दर्शन पूर्णपणे बंद, काय आहे कारण?

Bhimashankar Temple VIP Darshan Closed : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात VIP दर्शन बंद करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन बुकिंगशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

Alisha Khedekar

  • भीमाशंकर मंदिरात VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद

  • सर्व भाविकांना आता समान नियमांनुसार दर्शन घ्यावे लागणार

  • ऑनलाईन बुकिंगशिवाय मंदिर परिसरात प्रवेश नाही

रोहिदास गडगे, पुणे

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानाने दर्शन व्यवस्थेबाबत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे भीमाशंकर येथे कोणत्याही VIP व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नसून सर्व भाविकांना समान नियमांच्या आधारे दर्शन घ्यावे लागणार आहे. तसेच ऑनलाईन बुकिंगशिवाय मंदिर परिसरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नसल्याचे देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भीमाशंकर देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच इतर VIP व्यक्तींना मिळणाऱ्या विशेष दर्शन व्यवस्थेला पूर्णविराम मिळाला आहे. आता सर्व भाविकांना एकाच प्रक्रियेतून आणि समान नियमांनुसार दर्शन घेता येणार आहे. देवस्थान प्रशासनाच्या मते, दर्शन व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, शिस्त आणि समानता निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा विशेष दर्शनामुळे सामान्य भाविकांना तासंतास रांगेत थांबावे लागत होते. मात्र नव्या व्यवस्थेमुळे सर्वांना समान संधी मिळणार असून दर्शन प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.

सध्या भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २४ तारखेपर्यंतचे सर्व ऑनलाईन स्लॉट आधीच पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येण्यापूर्वी किमान दोन दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे.

देवस्थान प्रशासनाने भाविकांना विनंती केली आहे की, दर्शनासाठी येण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून स्लॉट तपासूनच नियोजन करावे. ऑनलाईन नोंदणी आणि वेळेचे नियोजन केल्यास भाविकांचा वेळ वाचेल आणि दर्शन व्यवस्था अधिक सुव्यवस्थित राहील. भीमाशंकर देवस्थानाच्या या निर्णयाचे अनेक भाविकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT