Hill Line Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

'एक फुल दो माली'; गर्लफ्रेंडवरून दोन गटात तुंबळ हाणामारी

भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

अजय दुधाणे

उल्हासनगर - उल्हासनगरात (Ulhasnagar) गर्लफ्रेंड कुणाची? यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. भररस्त्यात झालेल्या या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडीओ समोर व्हायरल होत आहे. याप्रकरणात हिललाईन पोलीस (Police) ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या भानू कोरी या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकिब खान नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. याच कारणावरून भानू कोरी याने शाकिबला फोन करून सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी १६ एप्रिल रोजी भानू हा त्याचे मित्र सोनू सोनकर आणि मुकेश यादव यांना घेऊन शाकिबला भेटण्यासाठी नेताजी चौक परिसरात गेला.

हे देखील पहा -

मात्र शाकिबला काहीतरी चुकीचे घडणार असल्याची कुणकुण लागल्याने त्याने देखील आधीच त्याच्या तीन मित्रांना तिथे बोलावून घेतले होते. तिथे गेल्यानंतर या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. भररस्त्यात सुरू असलेली ही फ्रीस्टाईल हाणामारीची घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे.

या हाणामारीत दोन्ही गटातले तरुण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेत करिअर करायचंय? मग 'हे' १० फुलफॉर्म जाणून घ्या

Maharashtra Live News Update : भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं - नवनाथ वाघमारे

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

SCROLL FOR NEXT