School Bus Saam Tv
मुंबई/पुणे

स्कूल बसेस कडून शासकीय नियमांचे उल्लंघन; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

स्कूल बसवर भरारी पथकाकडून कारवाई करा; मनविसेची अंबरनाथच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी

अजय दुधाणे

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये (Ambernath) विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या स्कुल बसेसकडून (School Bus) शासनाचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप मनविसेनं केला आहे. याबाबत मनविसेनं अंबरनाथच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत भरारी पथकामार्फत स्कुल बसेसवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षीपासून नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या स्कुल बसेस पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत. या स्कुल बसेसची फिटनेस चाचणी आणि एक्सपायरी तपासण्यासह शासनाने २०११ साली घालून दिलेल्या नियमांचं ओआलन त्यांच्याकडून होतं आहे का? याची चाचपणी करण्याची मागणी मनविसेनं केली आहे.

हे देखील पाहा -

अंबरनाथ शहरात सध्या अनेक खासगी शाळांकडून स्कुलबसेस चालवल्या जात आहेत. यापैकी अनेक स्कुल बसेसकडून नियम पाळले जात नसून त्यामुळं गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना सूचना द्याव्यात आणि त्यानंतरही शाळांनी स्कुलबसचे नियम पाळले नाहीत, तर आम्हाला शाळांची भेट घ्यावी लागेल, असं मनविसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांना निवेदन सुद्धा दिलं असून या सगळ्याची पडताळणी करून शाळांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असं जतकर यांनी सांगितलं आहे.

अंबरनाथ शहरात अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आलीये. अनेक कंत्राटदार हे शासनाचे नियम पाळत नसून या सगळ्यावर कारवाई होण्याची आवश्यकता यानंतर व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT