Tejas Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

महाविकास आघाडीच्या बैठकीत तेजस ठाकरेंची उपस्थिती; विनायक राऊतांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने त्यांच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक संपन्न झाली आहे.ही बैठक संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) व्यक्त केला आहे. दरम्यान, या बैठकीला तेजस उद्धव ठाकरे (Tejas Thackeray) उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Maharashtra Politics News In Marathi)

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठकीत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत महाविकास आघाडीच्या आमदारासहित अपक्ष १२ आमदार होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं. ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यामांशी संवाद साधला.

त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ही लढाई शंभर टक्के जिंकणार. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या विजयानंतर जल्लोष करणार. कोणताही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठकीत मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. मात्र तेजस ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तेजस ठाकरेंच्या उपस्थितीवर शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तेजस ठाकरे यांना आवड आहे म्हणून ते आले होते'अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी तेजस यांच्या उपस्थितीवर दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT