ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही
Vinayak Mete Accident Case : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा रविवारी पहाटे कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. ३ ऑगस्टला पहाटेच विनायक मेटे यांच्या कारचा पाठलाग झाल्याचा खुलासा मेटे यांचे सहकारी अण्णासाहेब मारकर यांनी केला होता. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली होती. आता पाठलाग करणारी ती कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारमध्ये ड्रायव्हरसह एकूण ६ जण होते.
शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते यांनी विनायक मेटेंच्या निधनाआधी त्यांच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा करण्यात आला होता. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं जात होतं.
स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची त्यांची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती. त्यानुसार आता पोलिसांनी चौकशी सुरू केली असून पाठलाग करणारी कार ताब्यात घेण्यात आली आहे. रांजणगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचे मालक कम चालक संदीप वीर याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहेत. अपघाताची घटना घडली त्या दिवशी या गाडीत संदीप वीर याच्यासह ६ जणं होते. ६ जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्याकारणाने ते शिरूरला गेले होते. त्यांचे नातेवाईक देखील शिरूर मध्ये असल्याने त्या कारणाने ते गेले होते. असे चौकशीमधून समोर आले आहे.
मेटेंच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार
दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी सुद्धा या अपघाताबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मेटे यांच्या मृत्यूनंतर माध्यमांसोबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.