जेव्हा बाप्पा सर्वसमावेशकतेचं प्रतिक बनतो.... - Saam Tv
मुंबई/पुणे

जेव्हा बाप्पा सर्वसमावेशकतेचं प्रतिक बनतो....

साम टिव्ही

पुणे : गणेशोत्सव Ganapati Utsav सर्वांचा उत्सव. भक्तीभावाबरोबरच मनंही जोडणारा. हा उत्सव साजरा करायला वयाचं बंधन येत नाही तसंच शारिरिक व्यंगाचंही. नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक्स Paralymics स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी Sportsmen आपल्याला मिळालेल्या विशेष प्राविण्यातून भारतीयांची मनं जिंकली. त्यांच्या यशात सारे भारतीय सहभागी झाले. नेमका हाच धागा पकडून पुण्याच्या Pune विलास जावडेकर डेव्हलपर्सनी Vilas Jawadekar Developers हाच यंदाचा गणेशोत्सव आगळ्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला. त्यातून निर्मिती झाली एका शाॅर्ट फिल्मची. vilas jawdekar developers ganapati celebrations

तीन मिनिटांच्या या शाॅर्ट फिल्ममध्ये कहाणी आहे दोन छोट्या भावंडांची. यापैक एक आहे मूकबधीर. आपल्या सोसायटीत गणेशोत्सव साजरा होत असताना दुसरा भाऊ आरती म्हणण्यासाठी स्टेजवर जातो आणि आरतीचे शब्द विसरतो. खाली बसलेला मूकबधीर भाऊ त्याला खुणांच्या भाषेतून आरतीचे शब्द सांगतो. त्याच्या या कृतीनं सगळेच भारावतात आणि त्याला स्टेजवर बोलावतात. स्टेजवरुन तो खुणांच्या भाषेतून आरती सादर करतो आणि समोरचा प्रेक्षकवर्ग त्याच भाषेत त्याला साथ देतो....

या छोट्याशा फिल्ममधून संदेश जातो तो सुखदुःखात सर्वांना सामावून घेण्याचा. विलास जावडेकर डेव्हलपर्स म्हणून आम्ही नेमकी हीच भावना जपण्याचा प्रयत्न करतो. आम्ही केवळ घरं बांधत नाही तर समविचारी लोकांना एकत्र येण्याचं एक व्यासपीठच उपलब्ध करुन देतो, असे विलास जावडेकर डेव्हलपर्सचे सीईओ आदित्य जावडेकर यांनी सांगितलं. हीच भावना सेतू अॅडव्हर्टायझिंगचे ऋग्वेद देशपांडे यांनीही व्यक्त केली.

या फिल्मची संकल्पना त्यांची आहे. सर्वसमावेशकतेचं प्रतिक म्हणून आम्ही गणेशाचा उत्सव साजरा करायचा ठरवला, असं त्यांनी सांगितलं. निखिल खैरे यांची पटकथा असलेली आणि वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केलेली ही छोटी फिल्म गणेशाच्या मांगल्यपूर्ण उत्सवाचा एका नवा रंग दाखवून देते. नेमकी त्याच कारणाने ही छोटी फिल्म सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT