Vikhroli Kannamwar Nagar News Saam TV
मुंबई/पुणे

Vikhroli News : पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी घटना

पतीच्या निधनाची बातमी कळताच, पत्नीनेही प्राण सोडले असल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या (Mumbai) विक्रोळी पूर्व परिसरात घडली.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Latest News : पतीच्या निधनाची बातमी कळताच, पत्नीनेही प्राण सोडले असल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या (Mumbai) विक्रोळी पूर्व परिसरात घडली. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. पती आणि पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Vikhroli Kannamwar Nagar News)

विनू कोशी आणि प्रमिला कोशी अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नमवार नगरमध्ये (Vikhroli) राहत असलेले विनू कोळी यांची सोमवारी अचानक तब्येत खराब झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी विक्रोळी टागोरनगर मधील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना विनू यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी विनू यांना मृत घोषित केले. दरम्यान, प्रमिला यांना पतीच्या निधनाची दु:खद वार्ता समजली. पतीचे निधन झाल्याचं कळताच, प्रमिला यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. (Vikhroli News Live)

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच प्रमिला यांचीही प्राणज्योत मालवली होती. एकाच दिवशी पती पत्नीचा मृत्यू झाल्याने विक्रोळी कन्नमवार परिसरात शोकांतिका पसरली आहे. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladghar Beach : अथांग पसरलेला 'लाडघर' समुद्रकिनारा, कोकणातील सीक्रेट बीच

Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

Beed News: बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, तरीही आरोपी मोकाट,पोलिसांवर प्रश्नचिन्ह|VIDEO

Shocking News : नवविवाहित जोडप्यानं एकत्रच वशिष्ठी नदीत उडी मारली, काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Live News Update: पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

SCROLL FOR NEXT