Vijay Wadettiwar Saam TV
मुंबई/पुणे

Nanded Hospital Death: चार दिवसांत शासकीय रुग्णालयात १०० हून अधिक मृत्यू, वडेट्टीवार यांचा आरोप

Vijay Wadettiwar News: चार दिवसांत शासकीय रुग्णालयात १०० हून अधिक मृत्यू, वडेट्टीवार यांचा आरोप

Satish Kengar

>> सचिन गाड

Vijay Wadettiwar On Nanded Hospital Death:

चार ते पाच दिवसांत शासकीय रुग्णालयात १०० हून अधिक मृत्यू झाला आहे. याला शासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. औषधा अभावी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाले आहेत, असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी वडेट्टीवार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''हे मंत्रीपदी राहण्यास योग्य नाही. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. उच्च न्यायालयाने देखील सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा. तसेच पीडित कुटुंबियांना १० लाखांची मदत करण्यात यावी.''

वडेट्टीवार म्हणाले, आम्ही राज्यपालांना भेटलो आणि ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणली. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत द्यावी, ही देखील मागणी आम्ही मांडली आहे. या प्रकरणामध्ये सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. अजूनही आरोग्य विभागात 50 टक्के जागा रिकाम्या आहेत. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यामध्ये 6000 आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं, ही मागणी आम्ही निवेदनाद्वारे दिली आहेत. ते म्हणाले की, महिला अत्याचारात महाराष्ट्र दुसरं राज्य झालेलं आहे. त्याकडे देखील लक्ष द्यावं, असं निवेदनात म्हटलं आहे.

याचबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ''औषध न मिळाल्यामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. यावेळी बजेट मांडण्यात आला त्यावेळी आरोग्य विभासाठी 13000 कोटी देण्यात आले. पुन्हा चाळीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. मात्र हे पैसे गेले कुठे? राज्यात आरोग्यवस्था ढासळली आहे. आम्ही राज्यपालांना भेटून या सरकार विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT