Vedanta Foxconn Project  Saam Tv
मुंबई/पुणे

Vedanta Foxconn Project : वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने जास्त सवलत देऊनही गुजरातला गेला

वेदांत-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात प्रकल्प प्रस्तावीत होता हा प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याचे बोलले जात होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: वेदांत (Vedanta)-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात प्रकल्प प्रस्तावीत होता हा प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी कालपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकावर हल्लाबोल सुरू केला आहे. या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकल्पला गुजरातपेक्षा महाराष्ट्राने १० हजार कोटींची जास्त सवलत देऊनही हा प्रकल्प गुजरातला मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत येण्याअगोदर वेदांत-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरल्पासाठी लागणारी आवश्यक ते प्रयत्न ठाकरे सरकारने केले होते, पण आता शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकल्पासाठी लागणारी पुर्तता केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे. या प्रकल्प प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे.

वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून होणारा प्रकल्प तीन टप्प्यांत महाराष्ट्रात होणार होता. यासाठी १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक होमार होती. आता हा प्रस्तावीत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे अनेक रोजगार गुजराला गेले असल्याचा आरोप केला जात आहे.

वेदांत प्रकल्पासाठी कोणत्या राज्याने किती सवलत दिली?

वेदांत समुह आणि फॉक्सकॉन च्या प्रकल्पसाठी महाराष्ट्र सरकारने ३९ हजार कोटींची सवलत दिली होती. तर गुजरात सरकारने वेदांत प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी फक्त २९ हजार कोटींची सवलत दिली आहे. पण तरीही वेदांतचा प्रकल्प गुजरातला मिळाला आहे.

जमीन विनाशुल्क

वेदांत समुहाच्या प्रकल्पसाठी गुजरात (Gujrat) सरकारने १ हजार एकर जमीन विनाशुल्क दिली आहे, तसेच वीज व पाणी सवलतीच्या दरात २० वर्षांसाठी एकाच दराने देण्यात येणार बोलले जात आहे. यामुळेही हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT