Navi Mumbai Crime samm tv
मुंबई/पुणे

Shocking Crime: '२ हजार द्या डेडबॉडी गुंडाळतो'; मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा लाचखोर सीसीटीव्हीत कैद

Navi Mumbai Crime news: वाशी रुग्णालयात मृतदेह गुंडाळण्यासाठी कर्मचाऱ्याने दोन हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Bhagyashree Kamble

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रूग्णालयातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल २ हजार उकळल्याचा प्रकार कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार नवी मुंबईतून समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

एका २३ वर्षीय तरूणीनेनं आत्महत्या करून आयुष्य संपवलं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रूग्णलयात पोहोचले. त्यावेळी नातेवाईकांना रूग्णालयातील कर्मचाऱ्याने, “कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो” असं सांगत थेट दोन हजार रुपयाची मागणी केली.

हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे कुठलेही अधिकृत शुल्क नसताना, दोनशे किंवा पाचशे नव्हे, थेट दोन हजार रुपयांची अवैध वसुली करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अशा प्रकाराबाबत आजवर तक्रारी येत होत्या, मात्र आता हा प्रकार प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.

पुण्यात येरवडा पोलिसांची कडक कारवाई

उधार न दिल्यामुळे वाईन शॉपमध्ये मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी आरोपीची भररस्त्यावर जनतेसमोर धिंड काढून कडक इशारा दिला. ही घटना येरवडा येथील एका वाईन शॉपमध्ये घडली. रोहित पुष्कराज पिल्ले या इसमाने दारू उधार न दिल्यामुळे संतापून दुकानदाराला मारहाण केली आणि दुकानात तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे ही घटना ज्या परिसरात घडली, त्याच भागात पोलिसांनी आरोपीची धिंड काढत कठोर कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन

Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

Maharashtra Politics : सरकारचा पैसा आहे, कितीही मागा आपल्या बापाचं काय जातंय; मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

SCROLL FOR NEXT