Vashi Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Vashi Fire: वाशीत बेकरीला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल

Vashi Fire: वाशी येथील जुहूगाव सेक्टर ११ मध्ये गावदेवी मैदानाच्या जवळ असलेल्या बेकरीला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची बाब समोर आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

Vashi Fire :

नवी मुंबईतील वाशी येथील जुहूगाव सेक्टर ११ मध्ये गावदेवी मैदानाच्या जवळ असलेल्या बेकरीला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. घटनास्थळी वाशी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. आग शमविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची बाब समोर आलीय. (Latest News)

अंधेरीत इमारतीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग

गेल्या तीनच्या चार दिवसात मुंबई आणि उपनगरात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून मुंबईच्या विविध भागात आगीच्या ६ पेक्षा अधिक आगीच्या दुर्घटना घडल्या. मागील बुधवारी रात्री अंधेरीत एका बहुमजली इमारतीच्या १२व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील शहाजीराजे क्रीडा संकुलासमोरील पर्ल रेसिडेन्सी या इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली होती.

अंबरनाथमध्ये धावत्या कारला अचानक आग

अंबरनाथमधील बदलापूर-शिळफाटा रोडवर मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत चार प्रवासी थोडक्यात बचावले. बदलापूर येथून कार अंबरनाथ शहराजवळील आनंद नगर बीट पोलीस चौकीजवळ धावत्या कारला ही आग लागली. या घटनेमुळे बदलापूर शिळफाटा रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग

नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना बुधवारी (३१ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. क्षणार्धात आगीच्या विळख्यात ६ मालवाहू ट्रक जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालवाहू ट्रक जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं. या ट्रकमध्ये केमिकल असल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. बघता-बघात आगीने रौद्ररुप धारण करत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर वाहनांना विळखा घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

Diwali bonus issue : बोनस दिला नाही, कर्मचारी संतापले, असं काही केलं की मालकाला बसला शॉक | VIDEO

Raigad Politics : गोगावलेंचा तटकरेंना जोरदार धक्का, कट्टर नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Kolhapur Mystery : बिबट्याचा हल्ला की घातपात? कोल्हापुरात रहस्यमय मृत्यू, कंक दांपत्याच्या मृत्यूमागे गुढ वाढले, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT