Pune: ''महानगरपालिकेची दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर हेलिपॅड'' Facebook
मुंबई/पुणे

Pune: ''महानगरपालिकेची दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर हेलिपॅड''

गुलटेकडी येथील टाऊन प्लॅनिंग स्कीम 144 येथील टी पी 125 ही जमीन दफनभूमीसाठी राखीव होती.

रोहिदास गाडगे

पुणे महानगरपालिकेची दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा पुण्यातील एक मोठं उद्योगपती स्वतःच्या हेलिपॅड साठी वापरत असल्याचा आरोप पुणे महानगरपालिकेतील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समिती कार्यालयाबाहेर खेळण्याच्या हेलिकॉप्टर उडवून वसंत मोरे यांनी भूखंडाचे श्रीखंड लाटण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकत्र मिळवून दफनभूमीची जागा एका मोठ्या उद्योगपतीला हेलिपॅड साठी उपलब्ध करून दिल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.

गुलटेकडी येथील टाऊन प्लॅनिंग स्कीम 144 येथील टी पी 125 ही जमीन दफनभूमीसाठी राखीव होती. मात्र त्या ठिकाणी सध्या पूनावाला यांचा हेलिपॅड अस्तित्वात असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. गुलटेकडी येथील टी पी 125 ही जागा द सोशल वेल्फेअर ट्रस्ट ऑफ पूना यांच्या उपयोगात आणण्याकरिता पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समिती मध्ये 7 जुलै 2021 रोजी ठराव पारित करण्यात आला. या ठरावात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी कोणतीही चर्चा न करता, अवघ्या काही मिनिटात ठराव पारित करून ही जागा पूनावाला यांच्या सोशल वेल्फेअर ट्रस्ट ऑफ पूना यांच्या उपयोगात आणण्याकरिता उपलब्ध करून दिली.

एकीकडे शहरात दफनभूमीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसताना देखील, महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पूनावाला यांना दफनभूमीची जागा हेलिपॅड उतरविण्यासाठी उपलब्ध करून दिली. असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. दफनभूमीसाठी राखीव असलेली फक्त जागा दफन भूमीसाठी वापरण्यात यावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा वसंत मोरे यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT