Vasantr More on Amit Thackeray Saam tV
मुंबई/पुणे

MNS Politics : राजसाहेब २५ वर्षात बोलले नाहीत, मात्र अमित ठाकरे बोलले; वसंत मोरे राजीनामा दिल्यानंतर झाले व्यक्त

Vasant More on Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी वसंत मोरे यांना झापलं होतं. तेव्हापासूनच वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे | पुणे

Vasant More on Amit Thackeray :

पुण्यातील मनसेचं मोठं नाव वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून मनसे सोडण्याची निर्णय घेत असल्याचं वसंत मोरे यांनी जाहीर केलं. यावेळी त्यांनी आपल्या सरकाऱ्यांवर गंभीर आरोप करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. वसंत मोरे यांनी आज अमित ठाकरे यांचाही उल्लेख केला.

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना कुठे दिसला नाहीत, अशी विचारणा केली होती. त्यावर वसंत मोरे यांनी आपण मोर्चात असल्याचा पुरावा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावरुन अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापलं होतं. तेव्हापासूनच वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती. यावर बोलताना वसंत मोरे यांनी आज म्हटलं की, राज साहेब ठाकरे २५ वर्षात कधीही बोलले नाही, मात्र अमित ठाकरे बोलले. वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या मनातलं आज बोलून दाखवलं. (Latest Marathi News)

काय होती वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट?

वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमितसाहेबांचा मला फोन आला होता. ते म्हणाले आजचा मोर्चा खूप छान झाला. मला समजले तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होतात. पण मला तुम्ही दिसला कसे नाही, भेटले कसे नाहीत.'

'मी साहेबांना बोललो, साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो त्याचा हा पुरावा. साहेब मी काम करणारा आहे नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल. मी तुमच्या मागे अगदी दोनच पावले चालत होतो. असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल. अमितसाहेब तुमच्यासाठी काही पण फक्त मला समजून घ्या.'

वसंत मोरे यांच्या या पोस्टनंतर अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना समजावले होते. सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, अशी समज देखील त्यांना दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut At Dasara Melava: या शिवतीर्थाच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ; संजय राऊतांचं महत्वपूर्ण विधान|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: दिल्लीतील रावणाला जाळायचं आहे - संजय राऊत

Badlapur Tourism : शहराच्या धावपळीपासून दूर वसलंय निसर्गरम्य ठिकाण, वीकेंडला बदलापूरला ट्रिप प्लान करा

Ravan Dahan: वरुणाराजाच्या माऱ्यापुढे राक्षस राजाची हार; वादळी पावसानं उडवलं मुडकं, तर कुठं रावणनं घेतली झोप

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

SCROLL FOR NEXT