भरधाव वेगात स्टंट मारणाऱ्या दुचाकी चालकांवरील कारवाई फक्त कागदावरच Saam Tv News
मुंबई/पुणे

भरधाव वेगात स्टंट मारणाऱ्या दुचाकी चालकांवरील कारवाई फक्त कागदावरच

कर्णकर्कश हॉर्न आणि फटाके फोडणारे सायलेंन्सर आणि स्टंट मारणाऱ्या दुचाकी यांच्यावरील वाहतूक पोलिसांचे कारवाईचे दावे कागदावरच असल्याचे बोलले तर वावगे ठरणार नाही.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई -विरार - दिवसेंदिवस शहरातील युवकांमध्ये दुचाकीने स्टंट स्टाईल मारण्याची फॅशन वाढतच आहे. वाहतुकीचे नियम मात्र वाऱ्यावर ठेवून युवक धूम स्टाईलने शहरात भरधाव वेगात गाड्या चालवत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांचा जीव धोक्यात सापडला आहे. शहरातील अशा बेजबाबदार बाईकस्वारांना कोण रोखणार ? हे पोलिसांचे जावई आहे का? असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होताना दिसत आहे. कर्णकर्कश हॉर्न आणि फटाके फोडणारे सायलेंन्सर वाहने, स्टंट मारणाऱ्या दुचाकी यांच्यावरील वाहतूक पोलिसांचे कारवाईचे दावे कागदावरच असल्याचे बोलले तर वावगे ठरणार नाही. (vasai virar traffic police is not taking proper action against Irresponsible bike riders)

हे देखील पहा -

एकीकडे कोरोनाचे सावट असताना त्याची भीती अजूनही नागरिकांच्या मनात घर करून आहे. त्यात लॉकडाउननंतर नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर खरेदीसाठी पडत आहेत. कोरोनामुळे काही दिवस सामसूम झालेले रस्ते आता पुन्हा गजबजले आहे. त्यातही काही बेजबाबदार युवक गाड्या बेजबाबदारीने चालवत आहेत. त्यामुळे काही जण या चालकांमूळे जखमी सुद्धा झाले आहेत. आधीच काही भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच या दुचाकी युवकांच्या त्रासामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा या बेजबाबदार वाहनचालकांमुळे नागरिकांचा मॉर्निंग वॉक व इव्हेंनिंग वॉक सुध्दा जीवघेण बनला आहे.

एकीकडे शहराची झपाट्याने वाढ होतच चालली आहेत, त्यातच वाहनांची संख्या देखील दुप्पट वाढत चालली आहे. बेजबाबदारपणे चालविणारे आणि जोरदार हॉर्न कर्कश आवाज करत काही युवक शहरात बिनधास्तपणे गाड्या चालवितात त्यामुळे अनेक नागरिक भयभीत देखील होत आहेत. आतापर्यंत धूम स्टाईलमुळे अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यावर नियंत्रण कोणाचेच नाही, अनेक वाहन चालक अपघाताचे नियम देखील पाळत नाहीत. त्याचा परिणाम अनेक नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास/ पायदळ करण्याची वेळ आली आहे. पायी चालणाऱ्यांपासून ते वाहनधारकांना या बेजबाबदार चालकांचा त्रास होत आहेत. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. यावर जनजागृती करण्याची देखील गरज आहे. पण वाहतूक पोलीस याकडे कानाडोळा करत असल्याने वाहनचालकांना मोकळे रान मिळाले आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कारवाई केल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कारवाईत आर्थिक दंडाची तरतूद

शहरात दुचाकी वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनांमध्ये आणि दुचाकिंमध्ये मोडीफिकेशन करून जास्त आवाजाचे सायलेंन्सर, हॉर्न बसविण्यात येतात. मोटार वाहन कायद्याअंतर्गत ध्वनिप्रदूषण करणारे कर्णकर्कश हॉन व फटाके फोडणारे सायलेंन्सर असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच स्टंट मारून भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या विरोधात 184 प्रमाणे कारवाई करून 1 हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो. पण वाहतूक पोलिस याकडे कानाडोळा करत ठोस कारवाई करत नाही. त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कारवाई केली आहे.

याठिकाणी होते स्टंटबाजी

रात्रीच्या वेळी नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था विभागातील चौथ्या रोडवर स्टंट आणि भरधाव वेगात दुचाकी चालवल्या जातात. तसेच वसईच्या सनसिटी परिसरात आणि विरारच्या विवा कॉलेज परिसरात दिवसाही भरधाव वेगात दुचाकी चालवून स्टंट मारले जातात.

भरधाव वेगातील वाहनांवरील कारवाई

सन 2019 : 924 केसेस - 9 लाख 47 हजार 800 रुपये दंड

सन 2020 : 2049 केसेस - 20 लाख 49 हजार रुपये दंड

सन 2021 (जूनपर्यंत) : 1019 केसेस - 10 लाख 19 हजार रुपये दंड

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्या बाप बेटाच्या जोडीला अटक

GST नोंदणी आणखी सोपी होणार,फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT