नर्सचे लपून विवस्त्र चित्रीकरण; कंत्राटी कर्मचाऱ्याचा प्रताप चेतन इंगळे
मुंबई/पुणे

नर्सचे लपून विवस्त्र चित्रीकरण; कंत्राटी कर्मचाऱ्याचा प्रताप

आरोपी ओमप्रकाश पांडे हा फरार असून त्याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन इंगळे

मीरा भाईंदर - येथील कोविड उपचार केंद्र मध्ये एका नर्सचे लपून विवस्त्र चित्रिकरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. ओमप्रकाश पांडे असे या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव असून पांडे हा लपून नर्स कपडे बदलत असताना चित्रीकरण करत असे. हा सर्व प्रकार नर्सच्या लक्षात येताच नवघर पोलीस ठाण्यात ओमप्रकाश पांडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, नवघर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे देखील पहा -

मीरा भाईंदर मध्ये गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने गोल्डन नेस्ट जवळ असलेल्या एमएमआरडिएच्या इमारतीमध्ये कोविड अलगीकरण व उपचार केंद्र सुरू केले होते. कोरोना काळात लोकांना हे उपचार केंद्र खूप उपयोगी ठरले. मात्र याच उपचार केंद्रात नर्ससोबत हा सर्व प्रकार घडला आहे.

आपले चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच नर्सने ओमप्रकाश पांडे याचा मोबाईल खेचून एका खोलीत बंद करून ठेवला. मोबाईलची तपासणी करताच त्यामध्ये व्हिडिओ क्लिप आढळून आले. पांडे याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली.

यानंतर नर्सने तात्काळ नवघर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आरोपी ओमप्रकाश पांडे हा फरार असून त्याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT