Vasai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Vasai Crime News: विवाहबाह्य संबंधाचं बिंग फुटलं; पत्नीच्या मदतीने नवऱ्याने प्रेयसीला संपवलं

Boyfriend killed Girlfriend: सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तपासात दोघांना अटक केलीये.

Ruchika Jadhav

Naigaon Crime:

वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आलीये. हत्या करून तरुणीचा मृतदेह वापी नदीमध्ये फेकण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तपासात दोघांना अटक केलीये. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी वसईचा राहणारा असून तो विवाहित आहे. तसेच तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉस्टयूम डिझाईनचं काम करतो. याच ठिकाणी मृत तरुणी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. ती सनटेक येथील रहिवासी होती. मयत २८ वर्षीय तरुणी आणि आरोपीमध्ये गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

काही दिवसांनी त्यांच्या नात्याबद्दल तरुणाच्या पत्नीला समजले. पत्नीला समजल्यावर तरुणाने पीडितेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तरुणी त्याची साथ सोडण्यास तयार नव्हती. शेवटी पती पत्नीने ठरवून तरुणीची हत्या करण्याचा कट रचला. त्यांनी मिळून तरुणीची हत्या केली. तसेच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि वापीमध्ये फेकला होता.

मयत तरुणीच्या बहिणीला तिच्या आणि तरुणाच्या प्रेमसंबंधाची माहिती होती. बऱ्याच दिवसांपासून बहिणीशी संपर्क न झाल्याने तिने पोलसांत धाव घेतली. तसेच दोन्ही पती पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता तरुणीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी ३०२ कलम लावत नवरा बायकोला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवार गटाच्या आमदारावर हल्ला; तोंडाला रुमाल बांधून आलेल्यांकडून कारवर दगडफेक

Evening Puja Timing: वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी देवपूजा करण्याची वेळ काय?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गमध्ये लपलेला 'हा' समुद्रकिनारा पाहताच मालदीव,थायलंड विसराल

Dombivli : डोंबिवलीत मोठा राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, कारही फोडली; Video

SCROLL FOR NEXT