Ganesh Festival Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Ganesh Festival: गणेशोत्सव मंडळात महिला नाचवल्या, गणेशमूर्तीसमोर अश्लील डान्स ; बघा संतापजनक VIDEO

Ganesh Festival Viral Video: गणेशोत्सव मंडाळात महिलांना नाचवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलांनी गणेशमूर्तीसमोर अश्लील डान्स केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • वसईतील गणेशोत्सव मंडळात महिलांनी अश्लील डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल.

  • गणेशाच्या मूर्तीसमोर हा संतापजनक प्रकार घडला.

  • गणेशोत्सव मंडळाविरोधात नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • वसईतील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा सुरू.

मनोज तांबे, वसई

वसईतील गणेशोत्सवादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वसईतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये महिलांना नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेशाच्या मूर्तीसमोर या महिला अश्लील डान्स करत असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गणेशोत्सव मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या कामन चींचोटी येथील करमळपाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात हा प्रकार घडला आहे. या गणेशोत्सव मंडळाने महिलांना नाचवले. श्री बालाजी मित्र मंडळाने हा गणपती बसला आहे. १० दिवसांचा गणेशोत्सव सण या मंडळातर्फे साजरा केला जातो. या गणेशोत्सव मंडळामध्ये महिलांना नाचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये बसवलेल्या गणरायाच्या मूर्ती समोरच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महिलांना नाचवले.या महिला अश्लील डान्स करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतिशय तोकडे कपडे घालून या महिला अश्लील डान्स करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

वसईमध्ये गणेशोत्सवामध्ये महिलाांना नाचवल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. या घटनेची सध्या वसईमध्ये जोरदार चर्चा होत आहे. या गणेश मंडळाच्या आयोजकांवर अश्लील कृत्य आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या अनुषंगाने नायगावच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT