Vasai Crime News saam tv
मुंबई/पुणे

Vasai Crime News: चिमुकलीला खाऊसाठी पैसे देऊन करायचा लैंगिक अत्याचार, पालकांना कळलं अन् भयानक घडलं...

Vasai Latest News: चिमुकलीला खाऊसाठी पैसे देऊन करायचा लैंगिक अत्याचार, पालकांना कळलं अन् भयानक घडलं...

Satish Kengar

Vasai Crime News:

वसईत एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका शाळेतील स्वयंपाक्याने सात वर्षीय मुलीला खाऊ देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचा केल्याची घटना घडली आहे.

पीडित मुलगी या शाळेत चौथीत शिक्कात असल्याची माहिती आहे. मौर्य, असं या घटनेतील आरोपच नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या सात वर्षीय मुलीकडे खाऊसाठी रोज पैसे जास्त असायचे. आपण मुलीला इतके पैसे देत नाही, मग तिच्याकडे इतके पैसे येतात कुठून? असा प्रश्न पीडित मुलीच्या पालकांना पडला. (Latest Marathi News)

त्यांनी याबाबत तिच्या मित्र-मैत्रीण आणि शाळेत विचारपूस करायचं ठरवलं. यानंतर पालक पीडित मुलीसोबत शाळेत आले. तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. याच शाळेत स्वयंपाक्या म्हणून काम करत असलेला मौर्य हा मुलीला रोज खाऊसाठी पैसे देत होता. खाऊसाठी पैसे देत असताना हा नराधम रोज या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत होता.

मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने शाळेत जमले. यावेळी संतप्त जमावाने मौर्यला चांगलाच चोप दिला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत करत आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT