Mahavikas Aghadi  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'वंचित'ने महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळला; जागावाटपांचा तिढा कायम, 'वंचित'ला किती जागा हव्यात?

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, मुंबई

maharashtra Political News :

लोकसभा निवडणुकीची घोषणा ही निवडणूक आयोगाकडून येत्या काही तासांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जागावाटपासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीने दिलेल्या जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने फेटाळला. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीने दिलेल्या जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने फेटाळला. महाविकास विकास आघाडीच्या जागावाटपांमध्ये जोपर्यंत सन्मानजनक जागा मिळणार नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत पुढील चर्चा करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाविकास आघाडीने दिलेल्या माहितीनुसार ४ जागा या वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्याची माहिती होती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माहितीनुसार, अकोला लोकसभा मतदारसंघ वगळता इतर २ जागा या महाविकास आघाडीने सोडल्या आहेत.

अकोला सोडून इतर दोन लोकसभा जागा या महाविकास आघाडीतील पक्ष मागील निवडणुकांमध्ये जिंकलेल्या नाहीत. अशा जागा वंचित बहुजन आघाडीला सोडल्या असल्याचं वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या जागांच्या प्रस्तावावर चर्चा करून तो फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे.

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक

दरम्यान, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी महाविकास आघाडीची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत तिढा कायम असलेल्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा होत आहे. या बैठकीमध्ये खासदार संजय राऊत, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार जितेंद्र आव्हाड , बाळासाहेब थोरात इत्यादी नेते उपस्थित आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT