Valentines Day 2025 
मुंबई/पुणे

Valentine's Day: पुण्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ३५ जोडप्यांचा फुलणार संसार, बांधणार लगीनगाठ

Valentines Day 2025 : पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात ३५ जोडपी लग्नबंधनात अडकणार आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने एकाच दिवशी हे जोडपे लग्न करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू असून या वीकमध्ये विविध डे साजरा केलं जात आहे. उद्या म्हणजेच १४ तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी तयारी करण्यात आली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुण-तरुणी एकमेकांना गुलाबाचा फुल देऊन प्रेम व्यक्त करत असतात. याच दिवशी पुण्यात ३५ जण लगीनगाठ बांधणार आहेत. पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालय येथे याच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने एकाच दिवशी ३५ जोडपे लग्न करणार आहेत.

याबाबत विवाह नोंदणी कार्यालयाचे प्रमुख संगीता जाधव म्हणाल्या की सध्या विवाह नोंदणी कार्यालयाचे कामकाज हे ऑनलाईन स्वरूपात झाले असून एका दिवशी ३५ लग्नाचं स्लॉट उपलब्ध असतात आणि एका आठवड्यापूर्वीच व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी चे सर्व स्लॉट हे बुक झाले आहे.या दिवशी आमच्या कार्यालय येथे ३५ लग्न होणार आहे.व्हॅलेंटाईन डे हे प्रेमाचं दिवस असतो आणि या दिवशी दरवर्षी मोठ्या संख्येने जोडपे लग्न करत असतात.

यंदा देखील आमच्या कार्यालयात ३५ लग्न होणार आहे अस यावेळी संगीता जाधव म्हणाल्या की, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयात रांगोळी काढून लग्नाच्या साठी येणाऱ्या जोडप्यांचे स्वागत करणार आहोत. तसेच येणाऱ्या जोडप्यांना गुलाबाचे फुल आणि चॉकलेट देण्यात येणार आहे. आम्ही इथ सेल्फी पॉइंट देखील उभं केलं असून त्याला देखील त्या दिवशी सजावट करणार आहोत.

प्रेमाचं दिवस असणाऱ्या या दिवशी जोडप्यांच प्रेमाने स्वागत करण्यात येणार आहे.सध्या सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन झाली असल्याने एकाच दिवशी ३५ स्लॉट उपलब्ध असतात आणि त्यामुळे या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयात ३४ जोडप्यांचे लग्न होणार आहे.जेव्हा ऑफलाईन पद्धत होती तेव्हा आमच्या येथे जवळपास ५० जोडपे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी लग्न करत होते अस देखील यावेळी संगीता जाधव यांनी सांगितल. त्यांच्याबरोबर बातचीत केले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Election : एकनाथ शिंदेंवर भाजप नेतृत्व नाराज, 'हॉटेल पॉलिटिक्स'वरून राजकारण तापले, दिल्लीकडे तक्रार

Kitchen Hacks : तांदळात किडे होतात? मग या योग्य पध्दतीने तांदुळ साठवा किडे होतील गायब

Accident News : भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Gold price today : आजही सोनं महागलं; मुंबई, पुण्यात 22k, 24k ची किंमत किती? वाचा लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला २० फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT