Vaishnavi Hagawane case Saam Tv News
मुंबई/पुणे

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : हगवणे भावांचे पाय खोलात, आता नवी चौकशी होणार

Pune Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे भावांच्या पिस्तूल परवान्याची पोलिस चौकशी सुरू झाली आहे. पत्त्याच्या खोट्या माहितीच्या आधारे परवाना मिळविल्याचा आरोप.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून सर्वच बाजूने चौकशी करण्यात येत आहे. आता हगवणे भावांना मिळालेल्या पिस्तूल परवाण्याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. राजेंद्र हगवणे यांच्या मुलांना पुणे पोलिसांकडन पिस्तूल वापरण्याचा परवाना मिळाला होता. परवाना घेत असताना हगवणेकडून पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला? असा सवाल उपस्थित केला जातोय.

चौकशी झाल्यानंतर बेकायदा काही समोर आल्यानंतर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. राजेंद्र हगवणे यांचे कुटूंब मुळचे भूकुममधील आहे. ते राहण्यास बावधन परिसरात आहेत. हगवणेचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मात्र, त्यांनी पुण्यात निवास असल्याचे दाखवून पिस्तुल परवाना घेतला. त्यासोबतच नीलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतले आहे. याप्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता. नंतर पडताळणी करून त्यांना परवाना दिला गेला. यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. एकाच घरातील शशांक व सुशील यांना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तुलाची काय अवश्यकता निर्माण झाली, ते तत्कालीन पौड पोलिसांच्या हद्दीत राहत असूनही पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला, असे प्रश्न उपस्थित झाले होते.

आरोपींचा पोलिस कोठडी आज संपणार -

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण तुरूंगात असणारे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अटक झाल्यानंतर कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने दोन्ही आरोपींना 28 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण 10 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

SCROLL FOR NEXT