Vaishnavi Hagawane Ukhana Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Ukhana: चंदेरी थाळी अन् सोनेरी मटण... वैष्णवी हगवणेच्या लग्नातील उखाणा होतोय व्हायरल, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Vaishnavi Hagawane Wedding Ukhana Video Viral: वैष्णवी हगवणेच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वैष्णवीने लग्नात नवऱ्यासाठी खास उखाणा घेतला होता.

Siddhi Hande

वैष्णवी हगवणेप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैष्णवी हगवणेच्या तिच्या सासरच्यांनी खूप छळ केला. तिला मारहाण केली. त्यानंतर वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहून संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने लग्नात नवऱ्यासाठी खास उखाणादेखील घेतला होता.

वैष्णवीचा उखाणा (Vaishnavi Hagawane Ukhana Video)

वैष्णवी लग्नानंतर पहिल्यांदाच उखाणा घेत होती.चंदेरी थाळी, सोनेरी मटण...शशांक रावांना आवडतं चिकन आणि मटन, असा उखाणा तिने घेतला. यानंतर तिने चिकनलव्हर असंही म्हटलं होतं. उखाणा घेताना तिच्या चेहऱ्यावरचं हसू सर्वकाही सांगत आहे. लग्नात ती किती खूश होती. परंतु याच लग्नाने तिचा जीव घेतला. तिला खूप त्रास दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वैष्णवीच्या लग्नासाठी खर्च (Vaishnavi Hagawane Wedding)

वैष्णवी हगवणेचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडला होता. तिच्या वडिलांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. लग्नानंतर वैष्णवी उखाणा घेताना दिसत आहे. ती हा उखाणा घेताना खूप आनंदी दिसत आहे. परंतु ज्या नवऱ्यासाठी एवढ्या आनंदाने उखाणा घेत होती. त्याच नवऱ्याने तिचा छळ केला.

वैष्णवीचा हुंडाबळी (Vaishnavi Hagawane Death Case For Dowry)

वैष्णवी हगवणेच्या लग्नात तिच्या वडिलांना ५१ तोळं सोनं, फॉर्च्युनर अन् चांदी दिली होती. त्यानंचरही तिच्या सासरच्यांची मागणी वाढत होती. तिच्या नवऱ्याने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपये मागितले होते. ते पैसे न दिल्याने तिचा खूप छळ झाला. तिला मारहाण झाली. वैष्णवीचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्यादिवशीही तिला मारहाण करण्यात आली होती. तिच्या अंगावण २९ व्रण होते. त्यातील ५-६ व्रण ताजे होते, अशी माहिती समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMMTMTTM Cast Fees : कार्तिक आर्यनने घेतले अनन्यापेक्षा 10 पट जास्त पैसे, 'तू मेरी मैं तेरा...'मध्ये कुणाला किती फी?

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

Pune Seat Sharing Update : पुण्यात तिरंगी लढत निश्चित! पण कुणाची आघाडी अन् कुणाची युती, जागावाटप कसं झालं? वाचा सविस्तर

Pune Travel : सह्याद्रीच्या कुशीत घडला इतिहास, पुण्याजवळील निसर्गसौंदर्याने नटलेला 'हा' किल्ला जगात भारी

Drishyam 3-Akshaye Khanna : 'दृश्यम 3'चा निर्माता अक्षय खन्नावर भडकला, चूक दाखवत म्हणाला- "त्याच्या डोक्यात हवा गेलीय..."

SCROLL FOR NEXT