Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates: Saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या, शरीरावर मारहाणीच्या २९ जखमा; वडिलांचा हगवणे कुटुंबीयांवर आरोप

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात ट्विस्ट आला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आला आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे आत्महत्येपूर्वी वैष्णवीला बेदम मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 'वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिचा खूनच करण्यात आला आहे.', असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. 'पोस्टमॉर्टमच्या अंतिम अहवालातही तिच्या शरीरावर मारहाणीच्या २९ जखमा असल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली आहे.

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यानी सांगितले की, वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या आहेत. त्यामधील १५ जखमा या २४ तासांच्या आतल्या आहेत. त्यामुळे तिचा मारहाण करून खून करण्यात आला.' अनिल कस्पटे यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात पोलिस तपासाची कोणतीही माहिती आम्हाला देत नाही, असं देखील त्यांनी सांगितले.

निलेश चव्हाणला लवकरात लवकर अटक करण्यात का येत नाही?, अशी विचारणा देखील अनिल कस्पटे यांनी पोलीस खात्याला केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडियाची नियुक्ती करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली. मात्र अजूनही आमच्या मागणीला शासनाने कोणतीही दाद दिली नाही.', असा दावा देखील अनिल कस्पटे यांनी केला आहे.

यावेळी वैष्णवीच्या बाळाच्या प्रकृतीबद्दल देखील अनिल कस्पटेंनी सांगितले. 'वैष्णवीच्या बाळाला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. मात्र सध्या त्याची प्रकृती ठीक असून तो चांगलं खेळत आहे.' अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेने १६ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते. याप्रकरणी तिच्या नवऱ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Result Live: ममता बॅनर्जी पिछाडीवर, भाजप उमेदवाराची मोठी आघाडी

मालेगाव-सटाणा शहराचा होणार कायपालट; रस्ता चौपदरीकरणाने अपघाताचा धोका टळेल, रोजगार अन् पर्यटन वाढेल

Tamil Nadu Election: रिक्षावाला बनला आमदार ! दोन दिग्गज नेत्यांना चारली धूळ

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सोबत हवाई प्रवास; विमानाच्या हवेत तीन घिरट्या नंतर... अचानक काय घडलं?

Dombivli : डोंबिवलीत पाणी संकट! 'या' भागात २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT