Priya More
हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने आत्महत्या केली.
वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची ती सून होती.
वैष्णवीच्या नवऱ्याचे नाव शशांक हगवणे आहे. दोघांनी लव्ह मॅरेज केले होते.
२०२३ मध्ये वैष्णवी आणि शशांक यांचे शाही थाटामाटात आणि मोठ्या धुमधडाक्यात लग्न झाले होते.
वैष्णवी ही अनिल कस्पटे या शेतकऱ्याची मुलगी होती. ती २३ वर्षांची होती.
वैष्णवीचे नवरा, सासू, सासरे, दीर आणि नणंद हे तिचा हुंड्यासाठी सतत छळ करत होते.
सतत होणारी मारहाण, शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने १६ मे रोजी आत्महत्या केली.
वैष्णवी आणि शशांकला १० महिन्याचे बाळ आहे. सध्या हा मुलगा वैष्णवीच्या आई-वडिलांकडे आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात ५१ तोळे सोनं, आलिशान कार, साडेसात किलोंची चांदीची ताट आणि वाट्या दिल्या होत्या.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात तिच्या नवऱ्यासह ५ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.