Vaishnavi Hagawane Case X
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : वैष्णवीसोबत चॅट करणारा 'तो' कोण? आरोपींच्या वकिलांनी दिली मोठी माहिती

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करत होती. ती ज्याच्याशी चॅट करत होती, त्या व्यक्तीने नाही म्हटले म्हणून वैष्णवीने आत्महत्या केली असावी असे हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी म्हटले आहे.

Yash Shirke

Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना न्यायालयासमोर हजर केले. वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद यांना एका दिवसाची, तर सासरे आणि दीर यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयात हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी एकतर्फी तपास करु नये असे त्यांनी म्हटले. विपुल दुशिंग यांच्या युक्तिवादाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

'गहाण ठेवलेलं सोनं ज्या बँकेत आहे, त्याची माहिती हगवणे कुटुंबाने आधीच दिली आहे. पोलीस कोठडी देण्याची गरज नाहीये. निलेश चव्हाणला आरोपी म्हणणे चुकीचे आहे. त्याचा या प्रकरणात काहीच संबंध नाहीये. तो फक्त हगवणेंचा नातेवाईक आहे. वैष्णवीच्या बाळाला सांभाळतााना त्याने हेळसांड केली. पण यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. निलेश चव्हाण चुकीचा असेल, तर त्याला फाशी द्यावी', असे वक्तव्य विपुल दुशिंग यांनी न्यायालयात केले.

वैष्णवी एका व्यक्तीशी चॅट करत होती, त्या व्यक्तीबाबत हगवणेंच्या वकिलांनी मोठी माहिती दिली. ते म्हणाले, 'वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही (हगवणे कुटुंब) पकडले. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीला आत्महत्या करायला आम्ही भाग पाडले नाही. ती ज्या व्यक्तीशी चॅट करत होती, त्या व्यक्तीचा १८ तारखेला साखरपुडा झाला. त्या व्यक्तीसंदर्भात आम्ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. त्या व्यक्तीने नाही म्हटले म्हणून वैष्णवीने आत्महत्या केली असावी.'

वैष्णवीने तिच्या वडिलांकडे तिचे हक्क सोड पत्र याआधीत दिलेले आहे. तेव्हा हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या आईवडिलांना पूर्ण मदत केली होती. वैष्णवीच्या जाण्याने जेवढे दु:ख कस्पटे कुटुंबाला झाले आहे, तेवढेच दु:ख आम्हाला (हगवणे कुटुंबाला) देखील झाले आहे, असे म्हणत विपुल यांनी हगवणेंची बाजू मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

SCROLL FOR NEXT