Vaishnavi Hagawane Case saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : वैष्णवीचे 'त्या' व्यक्तीसोबतचे चॅट्स आम्ही व्हायरल केले असते...; आरोपींच्या वकिलांचे खळबळजनक वक्तव्य

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबातील पाच जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यादरम्यान हगवणे यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधील आरोपी हगवणे कुटुंबियांना न्यायालयात सादर करण्यात आले. पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली. वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद यांच्या कोठडीत एका दिवसाची, तर सासरे, दीर यांच्या पोलीस कोठडीमध्ये ३१ मे पर्यंत वाढ झाली आहे. न्यायालयातील युक्तिवादादरम्यान आरोपींच्या वकिलाने, विपुल दुशिंगे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

'वैष्णवीच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर होता. ती कोणाशी तरी चॅटिंग करत होती. ती ज्या व्यक्तीसोबत चॅट करत होती, त्याचा १८ तारखेला साखरपुडा झाला. वैष्णवी ज्या व्यक्तीशी चॅटिंग करत होती, त्या व्यक्तीने नाही म्हटल्याने तिने आत्महत्या केली असावी. त्या व्यक्तीसंबंधित माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे, आता पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. चॅटिंगचा तिच्या आत्महत्येशी संबंध आहे का हे पोलिसांनी तपासावे', असे आरोपींच्या वकिलांनी म्हटले आहे.

हगवणे कुटुंबाचे वकील म्हणाले, 'वैष्णवी आमची सून होती. तिच्या मृत्यूमुळे फक्त कस्पटे कुटुंबाला जितकं दु:ख झालं आहे, तितकं दु:ख हगवणे कुटुंबाला देखील झाले आहे. आम्हाला त्यांचा संसार टिकवाचा होता. त्यामुळे वैष्णवीच्या मोबाईलमधील चॅटिंगनंतर आम्ही न कुठली नोटीस पाठवली ना घटस्फोटाचा अर्ज पाठवला. वैष्णवीच्या व्हॉट्अप चॅट्स आम्ही व्हायरल केले असते. पण फक्त तिच्या माहेरी कळवले. हा मुद्दा घेऊन पोलिसांनी अजूनही तपास केलेला नाही. पहिल्या दिवसापासून आमची ही मागणी आहे.'

वैष्णवीशी चॅट करणाऱ्या व्यक्तीचा साखरपुडा १८ तारखेला झाला. आत्महत्येशी त्या व्यक्तीशी काही कनेक्शन आहे का याचा शोध पोलीस घेत नाही. आम्ही त्या व्यक्तीचे नाव, माहिती, त्याच्या साखरपुड्याची तारीख, मोबाईलमधील चॅट्स न्यायालयासमोर सादर केले आहेत. वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक यांच्यात मोबाईलमधील चॅट्समुळे भांडण झाले आहेत, असा दावा आरोपी हगवणे कुटुंबियांच्या वकिलाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT