Nilesh Hagawane Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती; पत्नीसोबतचे बेडरूममधील खासगी क्षण अन् इतर महिलांचे VIDEO

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहाव्या आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकत काही वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी तपास केला असता, आरोपीच्या लॅपटॉपमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत.

Bhagyashree Kamble

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवी माहिती समोर येत असून, आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी चव्हाणच्या पुणे येथील कर्वेनगरमधील निवासस्थानी छापा टाकून त्याचा लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्या आहेत. या लॅपटॉपमध्ये पत्नी आणि इतर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी निलेश चव्हाण हा पुण्यातील कर्वेनगर परिसरातील रहिवासी आहे. त्याचे हगवणेंशी कौटुंबिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचं २०१८ साली लग्न झालं होतं. पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच निलेशच्या पत्नीचा छळ सुरू झाला. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर निलेशच्या पत्नीला त्यांच्या घरात स्पाय कॅमेरा आढळले.

एसी, सीलिंग फॅनमध्ये लपवलेले कॅमेरे पाहून तिने त्याला प्रश्न विचारले. मात्र निलेशने उडवाउडवीची उत्तरे दिली. एक दिवस निलेश घरात नसताना पत्नीने त्याचा लॅपटॉप तपासला. निलेशच्या लॅपटॉपमध्ये त्यात अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या. त्यात स्वतःसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते. इतकंच नाही तर, त्यात इतर महिलांबरोबरचेही अश्लील व्हिडिओ असल्याचे दिसून आलं.

निलेश जेव्हा घरी असायचा तेव्हा तो लाईट सुरू ठेवायचा. स्पाय कॅमेराच्या मदतीने तो पत्नी आणि त्यांच्यातील खासगी क्षण रेकॉर्ड करायचा. निलेश चव्हाणविरुद्ध पूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ड्रंक अँड ड्राइव्ह, पत्नीवर अत्याचार, धमकी या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता वैष्णवी प्रकरणातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT