Vaishnavi Hagawane Case Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, सासरे अन् दिराला अटक

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वैष्णवीचे सासरे अन् दीराला पोलिसांनी अटक केली आहे.

Siddhi Hande

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणेप्रकरणी पोलिसांनी अजून एक कारवाई केली आहे. वैष्णवी हगवणेच्या सासऱ्याला आणि दीराला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीला सासरच्यांकडून कौटुंबिक छळाचा सामना करावा लागला होता. यानंतर वैष्णवीचा नवरा, सासू अन् नणंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिचा सासरा आणि दीर फरार होते. आता पोलिसांना त्यांनाही शोधून काढले आहे.

बावधन पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आह. राजेंद्र हगवणे व त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही खेडेगावात लपून बसले होते. कालपासून पोलिसांच्या टीम हगवणे यांच्या शोधात होती. त्यानंतर आता सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणेला अटक करण्यात आली आहे.

मूळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणामध्ये दोषी असलेल्या सासरच्या व्यक्तींना आता अटक करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणेला तिच्या सासरच्यांनी मारहाण केली होती. वैष्णवीच्या मृतदेहावरदेखील मारहाण केल्याचे दिसत आहे. वैष्णवीने आत्महत्या केली, असं तिच्या नवऱ्याने सांगितले. परंतु आमच्या मुलीची हत्या केली, असा आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे.त्यानंतर वैष्णवीचा नवरा, सासू, नणंद आणि आता सासरे अन् दीराला अटक करण्यात आली आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी तिला लग्नात ५१ तोळे सोने, चांदी अन् फॉर्च्युनर गिफ्ट केली होती. लग्नानंतर काहीच दिवसात वैष्णवीला तिच्या सासरच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तिला मारहाण केली. तिच्या नवऱ्याने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती. याच त्रासाला कंटाळून गर्भवती असताना वैष्णवीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.यावेळी ती वाचली होती. परंतु आता त्यानंतर तिने पुन्हा मोठे पाऊल उचलले. १६ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला.याप्रकरणी आता नवरा, दीर, सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT