Vaishnavi Hagawane News Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : वैष्णवीचं बाळ लपवणारे कोण? हापापलेल्या हागवणेंची खुनशी मानसिकता

Vaishnavi Hagawane Case : लोभी हगवणेंच्या छळाची बळी ठरलेल्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाचेही हाल झालेत.... 6 दिवसात वैष्णवीच्या बाळाला 5 कुटुंबामध्ये फिरवण्यात आलं... मात्र मुलाची ससेहोलपट कशी झाली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

Vaishnavi Hagawane News : वैष्णवीच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी हे बाळ त्याच्या आजी आजोबांच्या कुशीत विसावलं... पण या चिमुकल्याला पुसटशीही कल्पना नसेल की त्याची आई यापुढे कधीच दिसणार नाही.. कारण हगवणे कुटुंबानं हुंड्यासाठी केलेल्या तालिबानी छळाची वैष्णवी बळी ठरलीय.... वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळही गायब करण्यात आलं होतं..मात्र 6 दिवसांनी वैष्णवीचा मुलगा तिच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आलाय... मात्र 6 दिवस बाळ कुठं होतं? त्याची माहिती समोर आलीय...

17 मे

वैष्णवी हगवणेचा छळामुळे मृत्यू

वैष्णवीच्या नवऱ्यानं म्हणजे शशांकनं बाळ त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं

वैष्णवीच्या नातेवाईकांकडून बाळाचा शोध

बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचं समोर

वैष्णवीच्या काकांची निलेश चव्हाणच्या घरी धाव, मात्र घर बंद

6 वा दिवस

अज्ञात व्यक्तीचा कस्पटेंना फोन, 'बाणेर हायवेला या आणि बाळ घेऊन जा'

वैष्णवीच्या काकांकडे हायवेवर अज्ञाताकडून बाळ सुपूर्द

वैष्णवी कधीच दिसणार नाही.. मात्र या चिमुकल्यामध्येच आम्ही वैष्णवीला पाहतो, अशी भावना तिच्या आईनं व्यक्त केलीय..

एप्रिल 2023 मध्ये शशांक हगवणेसोबत वैष्णवीचं लव्हमॅरेज झालं.. मात्र लग्नानंतर सुरु झालं हगवणे कुटुंबाकडून हुंड्यासाठीचं छळसत्र... सासू, सासरे, नणंद, दीर, आणि नवऱ्याकडून सततची शिवीगाळ, मारहाण....याच छळामुळे वैष्णवीचा मृत्यू झालाय....

मात्र वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हावरट हगवणेंनी किती हुंडा घेतला? पाहूयात....

- 51 तोळे सोनं

- 45 लाखांची फॉर्च्युनर कार

- 7.5 किलो चांदीची भांडी

- दीड लाखांचा मोबाईल

- सोन्याची अंगठी

- लग्नानंतर चांदीची मुर्ती

- महिन्याला 1-2 लाख रुपये

- जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी

वैष्णवीची आत्महत्या दिसत असली तरी तिच्या अंगावरील मारहाणीचे व्रण आणि जखमांमुळे ही तालिबानी वृत्तीच्या हगवणेंनी केलेली हत्याच आहे... त्यामुळेच राक्षसी वृत्तीच्या लोभी हगवणेंना फासावर लटकवून वैष्णवीला न्याय देण्याची गरज आहे.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्यसरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT