Vaishnavi Hagawane Case x
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : ...अन् तेव्हा त्यांची थेट सरकारी वकिलांना मारहाण; हगवणेंचे वकील दुशिंग यांची कुंडली समोर

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे वकीलपत्र विपुल दुशिंग यांच्याकडे आहे. या प्रकरणामुळे दुशिंग खूप चर्चेत आहेत. अशातच विपुल दुशिंग यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणे प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. हगवणे कुटुंबातील पाच जण सध्या पोलीस कोठडीत आहे. न्यायालयात या प्रकरणावर युक्तिवाद झाला. नवरा बायकोला चार कानशिलात लगावतो म्हणजे तो छळ करतो अशा प्रकारचे वक्तव्य हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी केले होते. त्यांनी केलेल्या युक्तिवादाची चर्चा पाहायला मिळत आहेत.

विपुल दुशिंग यांनी वैष्णवी कोणाशीतरी चॅट करत होती. तिच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह मेसेज होते. यावरुन वैष्णवी आणि शशांक यांच्यात वाद झाला होता. वैष्णवी ज्या व्यक्तीशी चॅट करत होती, त्या व्यक्तीने नाही म्हटल्याने वैष्णवीने आत्महत्या केली असावी असे विपुल दुशिंग यांनी म्हटले. त्यांनी केलेल्या 'नवऱ्याने बायकोच्या चार कानाखाली मारली म्हणजे ती हरॅसमेंट होत नाही' या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे विपुल दुशिंग चर्चेत आहेत. अशाच त्यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी एका सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केली होती. न्यायालयाने त्यावेळी अटक पूर्व जामीन मान्य केल्याने विपुल दुशिंग यांची अटक टळली होती.

काय होतं प्रकरण?

२०२२ मध्ये पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात विपुल दुशिंग हे एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. सुनावणीची पुढील तारीख ठरवण्यावरुन त्यांचा सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्याशी न्यायाधीशांसमोर वाद झाला. न्यायालयाच्या बाहेर पडल्यानंतर चिडलेल्या दुशिंग यांनी प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून मारहाण केली होती. अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर दुशिंग यांच्यासह दोन वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT