Rajendra Hagawane  Saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: 'त्यांनी असं कृत्य केलं..'; राजेंद्र-सुशील हगवणे लपून बसले 'त्या' फॉर्महाऊस मालकाचा धक्कादायक खुलासा

Vaishnavi Hagawane Case: सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघे घटना घडल्यानंतर सात दिवसांपासून फरार होते. अटकेपूर्वी दोघे आरोपी एका फार्महाऊसमध्ये लपून बसले होते.

Bhagyashree Kamble

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. मात्र, सहावा आरोपी अद्याप फरार आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पहाटे साडे चार वाजता अटक केली आहे. दोघेही घटना घडल्यानंतर सात दिवसांपासून फरार होते. आरोपी फरार होऊन एका फार्म हाऊसमध्ये गेले होते. या घटनेची माहिती समोर येताच फार्महाऊसच्या मालकांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

वैष्णवी हगवणे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही फरार होते. ७ दिवसानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ७ दिवस ते नेमके कुठे होते? याचा थांगपत्ता कुणालाच नव्हता. मात्र, १८ मे रोजी हे दोघेही वडगाव मावळ परिसरातील पवना डॅमजवळील बंडू फाटक यांच्या फार्महाऊसवर थांबले होते.

याच फार्महाऊसमध्ये ते लपून बसले होते. यावर आता फार्महाऊसचे मालक बंडू फाटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हगवणे माझ्या फार्महाऊसवर आले होते, पण त्यांनी काही गुन्हेगारी कृत्य केले आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती," असे फाटक यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, "हे लोक नेहमी येतात, म्हणून मी त्यांना 'जा' असं म्हटलं", असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या प्रकरणात अजून कोण फरार आहे का? या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: खासदार पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

SCROLL FOR NEXT