वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रशांत येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला? याचा शोध सध्या म्हाळुंगे पोलिसांकडून घेतला जात आहे. येळवंडे यांच्याकडून जप्त करणारे आणि ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्या मालकाकडे ही आता संशयाची सुई आहे. शशांक आणि लता हगवणेंच्या चौकशीत याचा खुलासा होऊ शकतो अशी माहिती महाळुंगे पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रशांत येळवंडे यांनी महाळुंगे पोलिस ठाण्यात हगवणे कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, खेड तालुक्यातील निगोजे गावात राहणारे प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे आणि शशांक राजेंद्र हगवणे यांचा जेसीबी रुपये 24,00,000 रुपयात विकत घेण्याचा व्यवहार मार्च २०२२ मध्ये झाला होता. व्यवहार ठरला तेव्हा प्रशांत येळवंडे यांनी त्यांना पाच लाख देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता.
या जेसीबीवर 19 लाख रुपयंचे इंडसइंड बँकेचे कर्ज असल्याने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे हगवणे यांना दरमहा 50,000 रुपये देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे हप्ते भरण्यासाठी एकूण रुपये 6,70,000 लता हगवणे यांच्या अकाउंटवर जमा करण्यात आले होते. मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरले नाही आणि ही रक्कम स्वतःसाठी वापरली. त्यामुळे जेसीबीसाठी कर्ज देणारी इंडसइंड बँकेने प्रशांत येळवंडे यांच्याकडून ऑगस्ट 2024 मध्ये जेसीबी ताब्यात घेतला. नंतर हगवणे यांनी जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला आणि प्रशांत येळवंडे यांच्या पुन्हा ताब्यात दिला नाही.
त्यामुळे प्रशांत येळवंडे हे त्यांची एकूण रक्कम 11,70,000 रुपये परत मिळावी किंवा जेसीबी त्यांना ताब्यात द्यावा यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. हगवणे यांनी त्यांना दाद दिली नाही. तसेच प्रशांत येळवंडे यासंबंधी एकदा चर्चा करण्यासाठी गेले असता शशांक हगवणे यांनी त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तुलावर हात ठेवून त्यांना 'तू मशीन 14 महिने वापरली आहे, आता पैसे मागू नको. नाही तर घरचे नीट राहणार नाही', अशी धमकी दिली होती.
सतत पाठपुरावा करून देखील रक्कम किंवा जेसीबी न मिळाल्याने प्रशांत येळवंडे यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये हगवणेंविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर हगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.