Vaishnavi Hagawane News Saam
मुंबई/पुणे

वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची, चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिल्याने आत्महत्या केली असावी; हगवणेंच्या वकिलांचा खळबळजनक दावा

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबाला न्यायालयात सादर करण्यात आले. या दरम्यान हगवणे यांच्या वकिलाने वैष्णवीशी संंबंधित अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

Yash Shirke

Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना आज (२८ मे) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची चर्चा पाहायला मिळत आहे.

'पोलीस कोठडी देण्याची काहीच गरज नाहीये, गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगवणे कुटुंबाने आधीच सांगितले आहे. निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे असून त्याचा यात काहीच संबंध नाही. तो फक्त हगवणे यांचा नातेवाईक आहे. त्याने बाळाला सांभाळताना हेळसांड केली म्हणून त्यावर गुन्हा दाखल केला. तो चुकीचा असेल, तर त्याला फाशी द्या', असे हगवणेंच्या वकिलाने म्हटले आहे.

'वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले. त्याची माहिती आम्हाला हवी होती. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नको त्या व्यक्तीने नाही म्हटले म्हणून तिने आत्महत्या केली असावी. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळे आहे, त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे', असे हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी म्हटले आहे.

'४० लाख रुपयांची गाडी दिली असे ते (वैष्णवीच्या माहेरचे) म्हणतात, आमच्या घरात ५ कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला त्रास देऊ', असे म्हणत हगवणे कुटुंबाची बाजू त्यांचे वकील विपुल दोशी यांनी मांडली आहे. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी असा दावा दोशी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT