Accident  saam tv
मुंबई/पुणे

Car Accident : कार चालवताना बँक मॅनेजरला डुलकी लागली; तिघांना उडवले, एकाचा मृत्यू

Uttar Pradesh Car Accident News : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने तिघांना उडवलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Uttar Pradesh Car Accident :

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने तिघांना उडवलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये कार चालकाने तिघांना उडवले. त्यानंतर पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतले. कार चालवताना डुलकी लागल्याने चालकाने तिघांना उडवल्याचे बँक अधिकाऱ्याने पोलीस चौकशीत सांगितलं.

अपघात कसा झाला?

रविवारी सायंकाळी यमुना एक्स्प्रेसवेवर तिघे जण बसची वाट पाहत होते. याचदरम्यान, भरधाव कारने तिघांना उडवले. या भीषण अपघातानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातामधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीपूरमध्ये राहणाऱ्या ३७ वर्षीय सुरेश सिंह या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तिघांना उडवणारा कार चालक हा बँकेत अधिकारी आहे. या बँक अधिकाऱ्याविरोधात आयपीसी कलम ३०४ ए अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'चौकशी दरम्यान चालकाने सांगितले की, 'एक्स्प्रेसवेवर गाडी चालवताना डुलकी लागली. यामुळे भीषण अपघात झाला'. दरम्यान, या कोर्टाने आरोपीचा जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, गौतम बुद्ध नगरमध्ये २०२३ साली एकूण १,१७६ रस्ते अपघात झाले. या रस्ते अपघातात ४७० लोकांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत झालेल्या अपघातात ८५८ लोक जखमी झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यात २०२२ साली ४३७ लोकांचा मृत्यू झाला होता.

ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे विचित्र अपघात

ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. अंबरनाथ-उल्हासनगर महामार्गावर एक ट्रक उभा होता. रस्त्यावर ऊन असल्याने एक वृद्ध व्यक्ती त्या ट्रकखालील सावलीत जेवायला बसला. त्या उभ्या असलेल्या ट्रक चालकाचं जेवायला बसलेल्या वृद्ध व्यक्तीकडे लक्ष गेलं नाही. त्या चालकाने लक्ष न दिल्याने ट्रक चालवल्यानंतर तो व्यक्ती ट्रक खाली चिरडला गेला. या अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT