Yashashri Shinde Case Saam Tv
मुंबई/पुणे

Yashashri Shinde Case : यशश्री शिंदे प्रकरणात नवा ट्विस्ट, शरीरावर आढळलेल्या २ टॅटूंनी गूढ वाढले

New Twist In Yashashri Shinde Case: यशश्रीने दाऊद शेखचे नाव आपल्या शरीरावर कोरले होते. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिस आता या बाजूने देखील तपास करत आहे.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात (Yashashri Shinde Case) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यशश्री शिंदेचा शवविच्छेदन अहवाल बुधवारी आला. या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती उघड झाली. यशश्री शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले. यामधील एक टॅटू आरोपी दाऊद शेखच्या नावाचा होता.

यशश्रीने दाऊद शेखचे नाव आपल्या शरीरावर कोरले होते. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिस आता या बाजूने देखील तपास करत आहे. यशश्री शिंदेचा मारेकरी दाऊद शेख सध्या तुरुंगात असून त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या यशश्री शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले. यशश्री शिंदेच्या अंगावरील या दोन टॅटूपैकी एका टॅटूवर आरोपी दाऊद शेखचे नाव असल्याचे दिसून आले. यशश्रीच्या अंगावर याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू काढण्यात आला होता.

हा टॅटू काढताना दाऊद शेखही त्याठिकाणी उपस्थित होता अशी माहिती सांगितली जात आहे. यशश्रीने आपल्या शरीरावर दाऊदच्या नावाचा टॅटू हा स्वखुशीने काढला होता की तिला जबरदस्ती करण्यात आली होती? या बाजूने पोलिस तपास करत आहेत. यशश्रीने हा टॅटू कुठून काढला, टॅटू आर्टिस्ट कोण होता याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

महराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकातल्या गुलबर्गा येथून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने लग्नाला नकार दिला म्हणून यशस्वीची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला दाऊद शेखला पनवेल सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दाऊदविरोधात वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.

यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. यशश्री उरणमध्ये ज्याठिकाणी राहत होती त्याठिकाणीच दाऊद देखील राहत होता. त्यांच्यामध्ये ३ ते ४ वर्षांपासून मैत्री होती. पण २०१९ मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दाऊदला पोलिसांनी अटक देखील केली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो कर्नाटकला निघून गेला होता. पण पुन्हा यशश्री आणि दाऊद यांच्यामध्ये संपर्क सुरू झाला होता. दोघेही एकमेकांना कॉल करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT