Rain Alert  Saam TV
मुंबई/पुणे

Rain Alert in Maharashtra : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता, कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज?

Rain Forecast in State : रविवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. अवकाळीमुळे शेतीचं नुकसान होण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. (Latest Marathi News)

कोणत्या जिल्ह्यांत अवकाळीची शक्यता?

समुद्रातील स्थितीमुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT