Nitin Gadkari saam tv
मुंबई/पुणे

Nitin Gadkari : नितीन गडकरींची तब्येत बिघडली; भाषण सुरू असताना अचानक आली भोवळ

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक तब्येत खराब झाली असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक तब्येत खराब झाली असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमात गडकरी यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. सिलिगुडी येथे भाषण करत असताना हा प्रकार घडला आहे. गडकरी (Nitin Gadkari) यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली बसले. त्यानंतर नजीकच्या रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याची प्राथामिक माहिती मिळते. आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा गडकरी यांना फोन करून तब्येतीची विचारणा केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पश्चिम बंगाल (West Bengal) दौऱ्यावर आहेत. ते आज सिलीगुडीतील शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या रस्त्याच्या उद्धघाटनासाठी आले होते. यावेळी दार्जिलिंग जंक्शनजवळील डागापूर मैदानात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंचावर नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.

दरम्यान, अचानक भाषण करत असताना, नितीन गडकरी यांना मंचावरच भोवळ आली आणि ते खाली बसले. गडकरी यांची अचानक तब्येत बिघडल्याने कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या सगळ्यानंतर नितीन गडकरी यांना भाजपचे स्थानिक खासदार राजू बिस्टा यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.

दरम्यान, स्थानिक डॉक्टरांच्या पथकाने गडकरी यांच्यावर प्राथामिक उपचार केले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आता गडकरी लवकरच दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. २०१८ मध्ये सुद्धा गडकरी यांची एका कार्यक्रमात तब्येत बिघडली होती. भाषण करत असताना, गडकरी अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले होते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

SCROLL FOR NEXT