Kisanrao Mohol passes away 
मुंबई/पुणे

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

Kisanrao Mohol passes away : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव दगडोबा मोहोळ यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Namdeo Kumbhar

Murlidhar Mohol father death news : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव दगडोबा मोहोळ यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मोहोळ कुटुंबासह पुणे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. आज सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.

किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC) सलग ४० वर्षे आपली सेवा बजावली होती. बँकेतील प्रदीर्घ सेवेसोबतच त्यांची एक नामवंत आणि कसलेले पैलवान म्हणूनही ओळख होती. क्रीडा आणि सहकार क्षेत्रात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले होते. किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (१८ जून २०२६) रात्री १०.२० वाजता दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासह क्रीडा वर्तुळावर आणि मोहोळ कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव दगडोबा मोहोळ यांच्या अंत्यसंस्काराबाबत मोहोळ कुटुंबियांकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यांचे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार आज शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी पुण्यामध्ये होणार आहेत.

अंतिम दर्शनाची वेळ आणि ठिकाण:

वेळ: शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी सकाळी ७:०० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत.

ठिकाण: 'वेणूकृष्णा' निवासस्थान, कोथरुड, पुणे.

अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण:

वेळ: शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता.

ठिकाण: वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे.

किसनराव मोहोळ यांच्या निधनामुळे पुणे जिल्हा सहकार क्षेत्र आणि क्रीडा जगतातून तीव्र दुःख व्यक्त केले जात असून, अंतिम दर्शनासाठी कोथरुड परिसरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT