death body  SaamTvNews
मुंबई/पुणे

Bhandup Dream Mall: भांडुपमधील मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

Dream Mall Bhandup latest news: भांडुप पश्चिम येथील ड्रीम मॉलमध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ड्रीम मॉलमध्ये पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

भांडुप पश्चिम येथील एलबीएस मार्गावर असलेल्या ड्रीम मॉलमध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ड्रीम मॉलमध्ये पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह ड्रीम मॉलच्या बेसमेंटमधील साचलेल्या पाण्यात होता. आधी तेथील काही कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह पाहिला. नंतर त्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. भांडूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. ती महिला नक्की कोण? तिचा मृत्यू कसा झाला की तिची हत्या करण्यात आली? याचा तपास पोलीस करीत आहेत.

एलबीएस मार्गावर असलेल्या ड्रीम मॉलचा बराचसा भाग बंद आहे. ड्रीम मॉलवरील रूग्णालयात काही वर्षांपूर्वी आग लागली होती. मॉलच्या पहिल्या मजल्यावर रूग्णालय आहे, काही कारणावरून रूग्णालयाला भीषण आग लागली होती. त्यावेळी हा ड्रीम मॉल चर्चेत आला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी मॉलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं हा मॉल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळी नऊच्या सुमारास काही कर्मचारी या मॉलमधील तळघरात काम करीत होते. तेव्हा तळघरातील साचलेल्या पाण्यात कर्मचाऱ्यांना मृतदेह आढळला आहे. कर्मचाऱ्यांना महिलेचा मृतदेह आढळल्यानं त्यांनी तातडीने भांडुप पोलिसांना याची माहिती दिली. भांडुप पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. साधारण ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पालिका रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अद्याप या महिलेची ओळख पटली नसून, याचा तपास पोलीस करीत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ड्रीम मॉलचा काही भाग बंद आहे. बंद असल्यामुळे त्या भागात सहसा कुणी जात नाहीत. ड्रीम मॉलचा बेसमेंट देखील बंद असतो. त्याठिकाणी पाणी साचले आहे. मॉलमध्ये अनेक ठिकाणी निर्जन स्थळं आहेत. या निर्जन स्थळांवर गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांचा वावर होत असतो, त्यामुळे आता या मृत महिलेसोबत नक्की काय झालं असेल? तिचा मृतदेह बेसमेंटमध्ये आलाच कसा? त्या मृत महिलेसोबत नेमकं काय घडलं असावं? याचा तपास भांडुप पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT