Kalyan  
मुंबई/पुणे

Kalyan : सूचना न देता अचानक सायरन वाजला, कल्याणमध्ये नागरिक पळतच सुटले

kalyan mock drill news : अचानक सायरन वाजल्याने केडीएमसी पालिका आणि शिवाजी चौक परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. सुरक्षारक्षकांना विचारले असता, दररोज चार वाजता सायरन टेस्टिंग केलं जात असल्याची माहिती दिली.

Namdeo Kumbhar

अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज दुपारी अचानक सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. कुठलीही पूर्वसूचना न देता वाजवलेल्या या सायरनमुळे परिसर काही वेळासाठी नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ झाली .काही क्षणातच सायरन टेस्टिंग साठी वाजवण्यात आल्याचं समजलं. मात्र अशा प्रकारे अनपेक्षित सायरन वाजवणं चुकीचं असल्याचं म्हणत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय आणि त्यालगतचा शिवाजी चौक परिसर आज दुपारी अचानक सायरनच्या आवाजाने हादरला. नागरिक, कर्मचारी आणि स्थानिक व्यापारी घाबरून गेले आणि काही क्षणांतच परिसरात गोंधळ व धावपळ सुरू झाली. पालिका आवार काही वेळासाठी पूर्णपणे रिकामा झाला.घटनेनंतर सुरक्षारक्षकांना विचारले असता, दररोज चार वाजता सायरन टेस्टिंग केलं जातं, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र या बाबत कुठलीही पूर्वसूचना नागरिकांना देण्यात आली नव्हती.

नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "अचानक सायरन वाजल्यावर काहीतरी आपत्ती आली की काय असं वाटलं. सायरनचा नेमका अर्थ काय हे आम्ही समजायचं तरी कसं?" असा सवाल उपस्थित करत पालिकेने माध्यमांतून किंवा सूचना फलकांवर ही टेस्टिंग आहे, हे स्पष्ट करावं, अशी मागणी केली."जर दररोजच टेस्टिंग करणार असाल, तर वेळ आणि कारण स्पष्ट करा. अनावश्यक गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावं," अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्षांना इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी

Success Story: ९ वर्षांची मेहनत, ८ वेळा अपयश, लग्नासाठी दबाव; कठीण परिस्थितीवर मात करत केली MPPSC क्रॅक; DSP मयंका चौरसिया यांचा प्रवास

Todays Horoscope: आज तुम्ही लपवून ठेवलेल्या गोष्टी सर्वांसमोर येऊ शकतात, जाणून घ्या राशीभविष्य

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

SCROLL FOR NEXT