Pune Crime News  
मुंबई/पुणे

Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत

Pune underwear thief : पुणे पोलिसांनी अंतर्वस्त्र आणि कपडे चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ३० हजार रुपयांचे कपडे हस्तगत करण्यात आले असून, तो पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहत होता.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Crime News Update : पुणे पोलिसांनी अंतर्वस्त्र चोरणाऱ्या टोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील दुकानातून "त्याला" टी शर्ट, नाईट पॅन्ट, अंडरगारमेंट चोरायचा नाद होता. पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या चोराकडून पोलिसांनी ७ लाख रूपयांचे अंतर्वस्त्र हस्तगत केले आहेत. पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या अनेक दुकानात त्यांना कपड्यांवर डल्ला मारला होता. गणपत मांगीलाल डांगी (४४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणीनगर भागातील एका दुकानातून अंडरगारमेंट (अंतर्वस्त्र) चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली होती. याच प्रकरणी एक व्यक्ती कल्याणीनगर भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता त्याने तिथून पळ काढला. येरवडा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले

त्याच्याकडे चौकशी केली असता तो पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितलं. त्याच्यावर याआधी कपडयाचे दुकानातून ८ लाख रु किंमतीचे लेडीज व जेन्टस अंडरगार्मेंट चोरी केलेबाबत गुन्हा दाखल आहे. आरोपीकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ७ लाख ३० हजार रुपये किंमतीचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टी शर्ट, नाईट पॅन्ट हस्तगत करण्यात आले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT