Ulhasnagar Saam
मुंबई/पुणे

Crime: आधी शेवया मागायला आला, नकार देताच धारदार शस्त्रानं सपासप वार; घरात वाहिला रक्ताचा पाट

Ulhasnagar Man Stabbed Over Refusal to Give Sevai: साईनाथ कॉलनीत राहणाऱ्या अफसर शेख यांच्यावर, किरकोळ कारणावरून, चाकूने हल्ला करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

अजय दुधाणे, साम टीव्ही

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून हा चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी व्यक्तीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कल्लन शेख असे आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात गावगुंड असल्याची माहिती आहे. अफसर शेख हे पीडित व्यक्ती आहेत. अफसर शेख हे उल्हासनगर येथील साईनाथ कॉलनीत वास्तव्यास असल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारी आरोपी कल्लन अफसर यांच्या घराबाहेर जाऊन उभा राहीला. त्याने अफसरकडे शेवया मागितल्या.

अफसर आणि त्याच्या कुटुंबाने शेवया देण्यास नकार दिला. शेवया देण्यास नकार दिल्यामुळे कल्लनला राग अनावर झाला. त्याने थेट अफसर यांच्या अंगावर चाकूने सपासप वार केले. यात अफसर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच अफसरला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती गंभीर झाल्यानंतर अफसरला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. नंतर पोलिसांनी अफसर आणि त्याच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हल्लेखोर कल्लन शेखला हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. तसेच घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

"चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्या"; चंद्रकांत पाटलांच्या फिंगरप्रिंट विधानावर संजय राऊतांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT