Ulhasnagar News Saam Digital
मुंबई/पुणे

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये आणखी एका डान्सबारवर हातोडा; आणखी ४ ते ५ डान्सबारवर होणार कारवाई

Ulhasnagar News Update : उल्हासनगरच्या पवई सेक्शन परिसरात वर्षा डान्सबार अनधिकृतपणे सुरू होता. या डान्सबारची कागदपत्रं पडताळून पाहिली असता तो अनधिकृत असल्याचं स्पष्ट झाल्यानं उल्हासनगर महापालिकेनं या बारवर कारवाई केली आहे.

Sandeep Gawade

अजय दुधाणे

उल्हासनगरच्या वर्षा डान्सबारवर महापालिकेनं कारवाई करत बांधकामावर हातोडा फिरवला आहे. मागील काही दिवसात उल्हासनगर महापालिकेनं तोडलेला हा तिसरा अनधिकृत डान्सबार असून आणखी ४ ते ५ डान्सबारवर कारवाई होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगरच्या पवई सेक्शन परिसरात वर्षा डान्सबार अनधिकृतपणे सुरू होता. या डान्सबारची कागदपत्रं पडताळून पाहिली असता तो अनधिकृत असल्याचं स्पष्ट झाल्यानं उल्हासनगर महापालिकेनं या बारवर कारवाई केली. दरम्यान, येत्या काळात आणखी ४ ते ५ डान्सबार पाडले जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे हे डान्सबार ज्यावेळी अनधिकृतपणे उभारले जातात, त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय करतात? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

SCROLL FOR NEXT