Viral Video Saam TV
मुंबई/पुणे

Viral Video : फिरत्या आकाश पाळण्यातून मुलगी धाडकन खाली पडली; उल्हासनगरच्या जत्रेतील थरारक घटना

Girl Fell From the Sky Cradle : पाळण्यातून मुलगी खाली पडली अशी महिती मिळताच जत्रेमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तिला वाचवण्यासाठी पाळणा चालक आणि स्थानिक नागरिक पुढे धावून आले.

Ruchika Jadhav

Akash Palna Viral Video :

उल्हासनगर येथील हिराघाट परिसरात महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरली आहे. या जत्रेमध्ये काल एक मोठी दुर्घटना घडली. फिरत्या आकाश पाळण्यातून एक लहान मुलगी खाली पडली. मुलगी पाळण्यामध्येच अडकून पडली होती. तिला वाचवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आकाशाला भेट देतोय असं भासवणाऱ्या या आकाश पाळण्यातून मुलगी खाली पडली तेव्हा जत्रेत एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी पाळणा चालकाचे पटकन लक्ष गेले आणि त्याने लागलीच पाळणा थांबवला. सुदैवाने मुलगी या पाळण्यातच अडकून पडली होती.

पाळण्यातून मुलगी खाली पडली अशी महिती मिळताच जत्रेमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तिला वाचवण्यासाठी पाळणा चालक आणि स्थानिक नागरिक पुढे धावून आले. पाळणा चालक अन्य नागरिकांच्या मदतीने उंच पाळण्यावर चढला. तसेच मुलीला पाळण्यातून खाली उतरवले.

सुदैवाने या मुलीचा जीव बचावला आहे. तिला पाळण्यातून खाली उतरवताच मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले असून घरी सोडण्यात आले आहे. या मुलीचा बचाव करतानाचा व्हिडिओ तेथील काही नागरिकांनी आपल्या फोनमध्ये कैद केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

जत्रेमध्ये फिरालया गेल्यावर येथील सर्वांना उंच आकाशपाळण्याचं आकर्षण असतं. मात्र आकाश पाळण्यात बसल्यावर अनेकांच्या पोटात गोळा येतो. त्यामुळे स्वत:ची काळजी घेत हौस आणि मौज मजा करावी. लहान मुलांना जत्रेमध्ये नेल्यावर आकाश पाळण्यात बसल्यावर त्यांच्याबरोबर रहावे. त्यांना एकटे सोडूनये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Live : भाऊबि‍जेला कट रचला, मनोज जरांगेंनी वाल्मिक कराड, पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, नेमकं कायकाय म्हणाले?

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

SCROLL FOR NEXT