Ulhasnagar Fighting Video Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime: वस्तूच्या किंमतीवरून वाद, दुकानासमोरच एकमेकांना तुडवलं; मोबाइलही फोडला, हाणामारीचा VIDEO व्हायरल

Crime News Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये वस्तूच्या किंमतीवरून वाद झाला. त्यानंतर दुकानासमोरच दुकानदार आणि ग्राहकामध्ये तुफान राडा झाला. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. मोबाइलमध्ये शूटिंग करत असल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने दुकानदाराचा महागडा फोन तोडला. खरेदी केलेल्या वस्तूच्या किमतीवरून ग्राहक आणि दुकानदार यांच्यामुळे वाद झाला. हाणामारीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

उल्हासनगरात किरकोळ वादातून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुकानदार ग्राहकाचा व्हिडिओ काढत असल्याने ग्राहकाने दुकानदाराचा फोन फोडून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी दुकानदाराने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील रामायण नगरमध्ये अनिल तोतानी यांचे दुकान आहे. सोमवारी सकाळी रोहित भगवाने आणि त्याची पत्नी हे त्यांच्या मुलासह वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात आले. रोहितने खरेदी केलेल्या वस्तूचा भाव न पटल्याने हा वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या हाणामारीत रोहितने दुकान मालक अनिल यांच्या डोक्यात वीट मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

तसंच, या हाणामारीत दुकान मालक अनिल मोबाइलमध्ये घटनेचे शूटिंग करत असल्याने संतप्त झालेल्या रोहितने अनिल यांचा ४० हजार रुपये किंमतीचा मोबाइल तोडला. तर या हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या अनिल यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. तर दुकानदाराने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप रोहितने केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT