Ulhasnagar News : काँग्रेसकडून नागरिकांना बाम वाटप; उल्हासनगरात रस्त्यांच्या दुरावस्था विरोधात निषेध आंदोलन

Ulhasnagar Corporation : उल्हासनगर शहर जिल्हा साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने उल्हासनगर मधील रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात उपोषण आणि निषेध आंदोलन शहर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले
Ulhasnagar Corporation
Ulhasnagar CorporationSaam tv
Published On

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्ते दुरुस्तीकडे उल्हासनगर महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असून खराब रस्त्यांचा त्रास वाहन धारकांना करावा लागत आहे. या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज निषेध आंदोलन करत उपोषण करण्यात आले. या आंदोलनाच्या ठिकाणी माजी मंत्र हुसेन दलवाई यांनी देखील हजेरी लावली होती.  

उल्हासनगर शहर जिल्हा साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने उल्हासनगर मधील रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात उपोषण आणि निषेध आंदोलन शहर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. येथील नेताजी चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. तर उल्हासनगर मधील रस्ते इतके खराब आहेत की मानेला पट्टा लावावा लागतोय असं मत माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी यावेळी म्हटले.

Ulhasnagar Corporation
KDMC News : महिनाभरापासून दूषित पाणीपुरवठा; केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

नागरिकांना वाटले बाम व मास्क 

काँग्रेसने केलेल्या आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आंदोलनस्थळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका व्यक्तीची पाठ दुखत असल्यामुळे उपोषणस्थळी एका नागरिकाला इंजेक्शन देण्यात आले. त्याच प्रमाणे उपोषण दरम्यान स्थानिक नागरिकांना झेंडू बाम आणि मास्कचे वाटप करण्यात आले. 

Ulhasnagar Corporation
Nagpur Crime : दुकानासमोर शिवीगाळ केल्याने हटकले; टोळक्याला घेऊन केले भयंकर कृत्य, घटना सीसीटीव्हीत कैद

उपोषणादरम्यान महानगरपालिकेला काही प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या. त्यात भुयारी गटर योजनेच्या अंतर्गत कामामधील विविध नागरी तक्रारींची दखल घेत ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाही करा. उल्हासनगर - ५ येथील डंपिंग ग्राउंड येथील रोड तात्काळ दुरुस्त करावे आणि एमएमआरडी अंतर्गत सुरू असलेले विविध रस्त्याच्या कामाची दर्जा तपासणी करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारास द्यावेत अशी मागणी करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com